कांदा प्रश्नावरून प्रहार संघटनेने अडविला मुख्यमंत्र्यांचा ताफा
Prahar organization blocked the Chief Minister's convoy over the onion issue
मुख्यमंत्री ताफा अडवला


मुख्यमंत्री ताफा अडवला


नाशिक, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

- केंद्र सरकारने कांद्यावरील बंदी उठवावी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने कांद्याच्या बाबत घेतलेले निर्णय चुकीचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही यासाठी वारंवार निवेदनही दिले आहेत परंतु त्यामधून कोणताही निर्णय होत नाही राज्य सरकारने कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये अनुदान द्यावे या मागणीसह कांद्यावर घातलेले निर्बंध मागे घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने दत्तू बोडके यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्याने नाशिक मध्ये आले होते त्यांच्या गाड्यांचा ताफा हा अशोक स्तंभ या परिसरातून जात असताना अचानक पणे प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आडवे झाले आणि कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, यासह विविध घोषणाबाजी करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी लागलीच त्यांना दूर केले आणि मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमाला रवाना झाले पण यादरम्यान घोषणाबाजी करून मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला यापूर्वी प्रहार संघटनेचे नेते दत्तू बोडके यांनी मुंबईत जाऊन या सर्व प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले होते तरीपण आज संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा आढविण्याचा प्रयत्न केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande