नांदेड शहरात ५१ योगाच्या उपशाखा उघडण्याचा संकल्प
नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)।दि.२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनापर्यंत नांदेड शहरात नित्य योग सेवा समिती अंतर्गत योगाच्या मोफत चालणाऱ्या ५१ उप शाखा उघडण्याचा दृढ संकल्प योगाचार्य नांदेड योग रत्नभूषण सीताराम सोनटक्के यांनी केला आहे. पतंजली योगपीठ ह
नांदेड शहरात ५१ योगाच्या उपशाखा उघडण्याचा संकल्प


नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)।दि.२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनापर्यंत नांदेड शहरात नित्य योग सेवा समिती अंतर्गत योगाच्या मोफत चालणाऱ्या ५१ उप शाखा उघडण्याचा दृढ संकल्प योगाचार्य नांदेड योग रत्नभूषण सीताराम सोनटक्के यांनी केला आहे.

पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत चालणाऱ्या योग अभ्यासाचा परिपाठ नांदेड येथे गेले अडीच वर्षापासून नित्ययोग सेवा समितीच्या मार्फत चालविला जात आहे. सीताराम सोनटक्के गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सकाळी ५ ते ७ या वेळेत देवकृपा लॉन्स, पूर्णा रोड, छत्रपती चौक येथे नियमित वर्ग चालू असून ह्या योग समितीच्या स्नेहांकित कॉलनी, सिंचन नगर, राज पार्क मालेगाव रोड या ठिकाणी ३ उपशाखा चालू आहेत. रोज योगाच्या माध्यमातून शेकडो साधक नित्य नियमाने योग अभ्यास करतात. या योगाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दूर्धर व लहान-मोठे आजार यापासून मुक्ती मिळवून अॅलोपॅथी दवाखाने व औषधीपासूनही मुक्ती मिळाली आहे. जगातील १८ देश आणि २५ लाख लोकांपर्यंत रोजचा योगा पोहोचविला जातो हे या नित्य योग सेवा समितीचे खास वैशिष्ट्य आहे. स्वतंत्रपणे योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, प्रत्येक घरामध्ये योग रुजावा, लोकांना निरोगी आणि आनंदी जीवन मिळावे यासाठी २० वर्षापासून योगाचार्य सिताराम सोनटक्के गुरुजी हे योगकार्यात व्यस्त आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande