
रायगड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। समता फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत अलिबाग जिल्हा कारागृह येथे बंद्यांसाठी त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत औषध पुरवठा करण्यात आला.
या आरोग्य शिबिरात डॉ. सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) यांनी बंदी बांधवांना त्वचारोगाची लक्षणे, उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच निदान व मोफत उपचारांवर भर देत कारागृहात दाखल असलेल्या २९ बंद्यांची त्वचारोग तपासणी करण्यात आली.
हा उपक्रम डॉ. सुहास वारके (भा.पो.से), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक श्री. योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके