संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 2024 व 2025 चा पर्यावरण पुरस्कार जाहीर
अमरावती, 27 फेब्रुवारी, (हिं.स.) - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ‘पर्यावरण पुरस्कार 2024’ व ‘पर्यावरण पुरस्कार 2025’जाहीर झाला असून दिनांक 5 मार्च, 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह येथे विद्यापीठाचे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा  2024 व  2025 चा पर्यावरण पुरस्कार जाहीर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे हस्ते 5 मार्च रोजी होणार प्रदान


अमरावती, 27 फेब्रुवारी, (हिं.स.) - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ‘पर्यावरण पुरस्कार 2024’ व ‘पर्यावरण पुरस्कार 2025’जाहीर झाला असून दिनांक 5 मार्च, 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते प्रदान होणार आहे. संस्था व व्यक्तिगत अशा दोन गटांमध्ये हा पुरस्कार पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणारी संस्था व व्यक्तीला विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जातो. संस्था गटात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र आणि रू. 15,000/- रोख व व्यक्ती गटात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र आणि रू. 10,000/- रोख, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘पर्यावरण पुरस्कार 2024’ करीता यावर्षी संस्था गटात हा पुरस्कार जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती या महाविद्यालयाला, तर व्यक्ती गटात नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबिड, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणाचे प्राचार्य डॉ. विजय हिम्मतराव नागरे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.‘पर्यावरण पुरस्कार 2025’ करीता यावर्षी संस्था गटात हा पुरस्कार मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा, जि. वाशिम या महाविद्यालयाला, तर व्यक्ती गटात अमरावतीचे श्री वसंत माणिकराव पाटील (माजी सैनिक) यांना जाहीर झाला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी पुरस्कार प्राप्तकत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तरी पर्यावरण पुरस्कार वितरण समारंभाला सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, पर्यावरण पुरस्कार निवड समिती 2024 चे अध्यक्ष डॉ.व्ही.एम. मेटकर व पर्यावरण पुरस्कार निवड समिती 2025 चे अध्यक्ष डॉ.आर.एम. कडू यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande