नांदेड - सोनखेड येथे श्री संत जगद्गुरू तुकोबाराय बीज उत्सवास प्रारंभ
नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। सोनखेड नगरीत अखंड हरिनामाचा गजर घुमू लागला असून संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर (३७५) अमृत महोत्सवानिमित्त आयोजित बीज उत्सवाला भक्तिभावात प्रारंभ झाला आहे. देहूनंतर प्रति देहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतभूमी
नांदेड - सोनखेड येथे श्री संत जगद्गुरू तुकोबाराय बीज उत्सवास प्रारंभ


नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। सोनखेड नगरीत अखंड हरिनामाचा गजर घुमू लागला असून संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर (३७५) अमृत महोत्सवानिमित्त आयोजित बीज उत्सवाला भक्तिभावात प्रारंभ झाला आहे. देहूनंतर प्रति देहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतभूमी सोनखेड येथे सप्ताहासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ६ ते ७विष्णुसहस्त्रनाम, सकाळी ७ ते १२ तुकोबारायांच्या गाथेचे पारायण, दुपारी १ ते २ गाथा भजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ हरिकीर्तन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताह काळात दररोज दोन वेळा अन्नदानाची पंगत होत आहे.

२८ रोजी हभप गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर, १ मार्च हभप पंढरीनाथ महाराज पगार, २ मार्च हभप पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी देवाची), ३ रोजी हभप गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी, ४ रोजी हभप गाथामूर्ती दत्तात्रय महाराज अंबीरकर, ५ रोजी सांगता सोहळा व पालखी मिरवणूक होणार आहे. तसेच संत तुकाराम महाराज व विठ्ठल-रुक्मिणींचा महाअभिषेक होणार असून गाथापारायणाची सांगता व गाथा पूजन होईल. सकाळी १० ते १ या वेळेत ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे गुलालाचे कीर्तन रंगणार आहे. त्यानंतर बाजार मैदान, सोनखेड येथे सार्वजनिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत तुकोबारायांची पालखी गावातील प्रमुख मार्गावरून भक्तिभावात काढण्यात येणार आहे. रात्री ९ ते ११ ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन होणार आहे. ६ मार्च रोजी ह.भ.प. गुरुराज महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande