लातूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी; पोलीस बंदोबस्त चोख
लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) लातूर शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर यांच्या प्रांगणात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. कीर्तन, भजन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर
पोलीस अधिक्षक


लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) लातूर शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर यांच्या प्रांगणात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. कीर्तन, भजन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच भाविकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

सुरक्षा व्यवस्थेची पाहणी

पोलीस अधीक्षकांनी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच भाविकांच्या ये-जा मार्गांची प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधून व्यवस्थेबाबत विचारपूस केली. पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध बंदोबस्ताबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक केले.

भाविकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनीही शिस्त व सुव्यवस्था राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande