ठाणे - सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापौर पिंपळोलकर यांनी केला सन्मान
ठाणे, 27 फेब्रुवारी, (हिं.स.) : ठाणे शहराच्या विकासात आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. अनेक वर्षे कर्मचारी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने अधिकारी कर्मचारी महापालिकेची सेवा
Thane - Mayor Pimpolkar honored retired employees


ठाणे, 27 फेब्रुवारी, (हिं.स.) : ठाणे शहराच्या विकासात आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. अनेक वर्षे कर्मचारी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने अधिकारी कर्मचारी महापालिकेची सेवा करत असतात, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे देखील आनंदाने व्यतीत करा असे नमूद करत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

ठाणे महापालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आज ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे आदी उपस्थित होते.

सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना उत्तम आरोग्य, आनंदी आणि समृद्ध आयुष्याच्या शुभेच्छा महापौरांनी दिल्या. यावेळी सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून विविध विभागातील एकूण 36 अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande