
लातूर, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। राज्यात सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यातील चालु गळीत हंगाम 2025-26 मधील उत्पादीत 11,11,121 व्या साखर पोत्याचे पुजन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपरावजी देशमुख साहेब व लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी मांजरा परिवारातील संस्थांचे चेअरमन संचालक मंडळ अधिकारी उपस्थित होते.
*कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ*
*माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घोषणा*
यावेळी बोलताना माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख साहेब यांनी कारखान्याचे कर्मचारी यांनी 101 दिवसात उत्तम गाळप केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व कारखान्यातील कर्मचारी यांना त्रिपक्षीय करारानुसार ठरलेली 10% पगार वाढ लागू करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले व कारखान्याने चालु गळीत हंगामाचे गाळप दि. 18/11/2025 रोजी चालु झाले असुन कारखान्याने दि. 26/02/2026 अखेर 101 दिवसात कार्यक्षमतेचा पुरेपुर वापर करुन 6,72,250 मे.टन गाळप करुन बी हेवी मोलसेस व सिरप इथेनॉलसह सरासरी 12.28% साखर उताऱ्यासह 5,52,800 क्विंटल साखर उत्पादीत केली कारखान्याचे आसवाणी प्रकल्पही सुरु आहे यामध्ये 1,15,49,472 लिटर इथेनॉल उत्पादन व तसेच कारखान्याच्या सहविज निर्मिती प्रकल्पातुन 2,31,10,000 युनिटचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली .
यावेळी कार्यक्रमास विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथराव शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड प्रमोद जाधव, बाजार समिती सभापती जगदीश बावणे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव ठाकुर (देशमुख), उपाध्यक्ष ॲड. प्रविण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, माजी उपाध्यक्ष तथा संचालक श्री शैल्य उटगे, संचालक, शेती कमिटी अध्यक्ष कैलास पाटील, सर्वश्री मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत ऊफाडे, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख ज्ञानेश्वर पवार, भैरु कदम, सदाशिव कदम, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, अरुण कापरे, विलास चामले, शंकरराव बोळंगे, अनिल दरकसे, बालाजी पांढरे, श्रीकृष्ण काळे, सुरेश चव्हाण, शत्रुघ्न पाटील, तानाजी जाधव कार्यकारी संचालक पंडित देसाई , शेतकरी सभासद व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis