पैठणच्या नाथषष्ठीची तयारी अंतिम टप्यात
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। यंदाच्या नाथषष्ठीसाठी खा. संदीपान भुमरे व आ. विलास भुमरे यांच्या प्रयत्नाने नाथषष्ठीसाठी २ कोटी ९३ लाखाचा भरीव निधी प्राप्त झाला असुन त्या अनुषंगाने नाथषष्ठीपुर्व तयारीला अंतिम टप्यात वेग प्राप्त झाले असुन
पैठणच्या नाथषष्ठीची तयारी अंतिम टप्यात


छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। यंदाच्या नाथषष्ठीसाठी खा. संदीपान भुमरे व आ. विलास भुमरे यांच्या प्रयत्नाने नाथषष्ठीसाठी २ कोटी ९३ लाखाचा भरीव निधी प्राप्त झाला असुन त्या अनुषंगाने नाथषष्ठीपुर्व तयारीला अंतिम टप्यात वेग प्राप्त झाले असुन सर्व तयारीवर नगराध्यक्ष विद्या भुषण कावसनकर उपाध्यक्ष तुषार पाटील हे जातीने लक्ष देऊन आहेत.

येत्या ९, १० व ११ मार्च रोजी नाथषष्ठी संपन्न होणार असुन तुकाराम बिजेपासुन नाथषष्ठीला प्रारंभ होतो मात्र मुख्य सोहळा तीन दिवस असतो शेवटी कालाष्टमीची दहीहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता होते, अश्या या पर्वासाठी राज्यासह आसपासच्या राज्यातील लाखो भाविक शहरात दाखल होत असतात शहरभर तीन दिवस भानुदास एकनाथचा गजर आहोरात्र सुरु असतो अश्या या धार्मिक सोहळ्यासाठी येणार्या लाखो नाथभक्तांना सोयी सुविधा देण्याची जबाबदारी हि नप प्रशासनाकडे असते.

यंदाच्या नाथषष्ठीपुर्व नपच्या निवडणूका पार पडून युवा नगराध्यक्षांसह नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी या नाथषष्ठीसाठी भरीव असा २ कोटी ९३ लाखाचा निधी दिल्याने यंदा नाथभक्तांना कुठल्याच सोयी सुविधांची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही नगराध्यक्षा विद्या भुषण कावसनकर व उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी दिली आहे.

तसेच प्रशासकीय स्तरावर देखील शहर व यात्रा मैदानात यथायोग्य कामे सुरु असुन मुख्यधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन प्रमुख व्यांक्टी पापुलवार यांच्या देखरेखीखाली सर्व कर्मचारी आहोरात्र यात्रा मैदानात स्वच्छतेसाठी कर्तव्यावर असुन वारकर्यार्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाथषष्ठीचे हृदय म्हणुन गोदावरीच्या वाळवंटाची ओळख आहे, शेकडो दिंड्या या ठिकाणी तीन दिवस मुक्कामी असतात या वाळवंटात खुद्द नगराध्यक्षा विद्या कावसनकर, उपाध्यक्ष तुषार पाटील, भुषण कावसनकर व नपचे मुख्यधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, उपमुख्यधिकारी सोमनाथ गर्जे, तथा आधिकारी कर्मचारी लक्ष देऊन आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande