
लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा मृत्यू काही दिवसापूर्वी नवोदय विद्यालय येथे झाला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनुष्का पाटोळे यांच्या आईशी भेटून दीर्घ चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. कुटुंबाच्या भावना, त्यांचा संशय आणि त्यांनी मांडलेले तथ्य अत्यंत गांभीर्याने केंद्रीय मंत्री आठवले यांनी ऐकले. ते म्हणाले की या प्रकरणात सीआयडीमार्फत सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे मात्र कुटुंबाने व्यक्त केलेल्या कटकारस्थानाच्या शक्यतेमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
कुटुंबाने CBI चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अनुष्काला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.अनुष्काला न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन पक्ष आणि मी स्वतः कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis