मराठी भाषेच्या विकासासाठी मराठीचाच वापर करा- प्रा. डॉ. संतोष जाधव
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। मराठी भाषेचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मराठीतच बोला, मराठीतच लिहा, मराठी साहित्य वाचा म्हणजेच मराठी भाषेचाच वापर करा, असे आग्रही प्रतिपादन प्रा. डॉ. संतोष जाधव यांनी आज (दि. (२७) जिंतूर येथे मराठी भाषा गौरव द
मराठी भाषेच्या विकासासाठी मराठीचाच वापर करा- प्रा. डॉ. संतोष जाधव


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

मराठी भाषेचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मराठीतच बोला, मराठीतच लिहा, मराठी साहित्य वाचा म्हणजेच मराठी भाषेचाच वापर करा, असे आग्रही प्रतिपादन प्रा. डॉ. संतोष जाधव यांनी आज (दि. (२७) जिंतूर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वाचन कक्षात मराठी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक तथा भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष जाधव हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उत्कृष्ट वाचक पुरस्कार विजेते बालासाहेब जाधव कुदळकर, उपप्राचार्य पांडुरंग निळे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. जाधव बोलत होते. ते म्हणाले की, मराठी भाषा ही अतिशय प्राचीन आणि समृद्ध अशी आहे. तिला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता तिच्या विकासासाठी प्रकर्षाने मराठीचाच वापर केला पाहिजे. दैनंदिन व्यवहारात, समाजमाध्यमांमध्ये देखील मराठी भाषेचा वापर करावा. एवढेच नव्हे तर संपूर्ण विज्ञान आपण मराठी भाषेमध्ये लिहून काढले पाहिजे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande