
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। कृषी व प्रक्रिया उद्योगात जागतिक स्तरावर मोठी क्रांती झाली आहे. आपल्या देशातील शेतक-यांनी देखील ’कृत्रिम बुध्दीमत्ता’चा (ए आय) वापर वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात कृत्रिम बुध्दीमत्ता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . या कार्यशाळेत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . वसंतराव नाईक अध्यासन केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत 'क्लाऊड, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा प्रात्यक्षिकांसह सखोल प्रशिक्षण देण्यात आले. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेस जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर होते. व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. अभिजीत शेळके आणि वसंतराव नाईक अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. यशवंत वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉ.अमृतकर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने शेतक-यांसाठी अनेक अॅप व तंत्रज्ञान विकसीत केले आहेत. तसेच प्रक्रिया उद्योगासाठीही अनेक योजना जाहिर केल्या आलेत. कृषी मालाचे मार्वेâटिंग करणे गरजे आहे, असेही ते म्हणाले.
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आशुतोष एस. भाकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या संधी व गरजांविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना क्लाऊड कम्प्युटिंग, एआय, डेव्हऑप्स तसेच अॅेग्री एआय विषयांचे प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण देण्यात येणार असून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अंकुश काथार, रचना भाकरे, साकेत शिसोदिया, अमेय नेरकर आणि पवन वानखेडे हे विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis