
बीड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती यांच्या वतीने 'लैंगिक छळ प्रतिबंध व तक्रार निवारण' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापुराव गहिनीनाथराव मरलापल्ले हे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महाविद्यालयातील सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालयात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यशाळेसाठी महिला तक्रार निवारण समितीच्या बाह्य सदस्या मनिषा तोकले उपस्थित होत्या. त्यांनी लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम २०१३, तसेच महिलांचे कायदेशीर हक्क याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून विषय प्रभावीपणे स्पष्ट केला. सदरील कार्यक्रमासाठी अशोक तांगडे अध्यक्ष बालकल्याण समिती बीड हे ही उपस्थित होत. या कार्यक्रमासाठी प्रा. मोरे डी.एन, प्रा. गायकवाड एस-एस, प्रा.शेप एम.एस, प्रा.ढोक.पी. आर महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमास विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis