श्री योगेश्वरी देवस्थानाला मुंबईच्या एका भक्ताकडून १ कोटींची देणगी
बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मुंबई येथील भक्ताने मंदिराच्या शिखर बांधकामासाठी थ एक कोटी रुपयांची देणगी दिली. नाव न सांगण्याच्या अटीवर देणगी दिली. अंबाजोगाई येथील श्री योगेश्व
योगेश्वरी देवस्थान


बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मुंबई येथील भक्ताने मंदिराच्या शिखर बांधकामासाठी थ एक कोटी रुपयांची देणगी दिली. नाव न सांगण्याच्या अटीवर देणगी दिली. अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराचे असलेले शिखर हे शंभर वर्षापूर्वीचे आहे. त्याचे बांधकाम चुन्यात असल्याने ते आता तकलादू झाले आहे. या शिखराच्या कामाचा जीर्णोद्धार करणार असल्याचे योगेश्वरी देवल कमिटीने जाहीर केले. याची माहिती मुंबई येथील भक्ताला माहीत झाली.

या शिखराच्या कामासाठी किमान ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांना समजले. त्यांनी श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या विश्वस्तांकड़े

एक कोटी रुपयांचा धनादेश पाठवून दिला. त्या धनादेशाची रक्कम बँकेत जमादेखील झाली. आता या शिखराच्या रकमेतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम या आठवड्यात सुरू होत आहे.

या कामासाठी तामिळनाडू येथील खास कारागीर नक्षीकाम करत या शिखराचे बांधकाम पूर्ण करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande