
लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
: लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती/उपसभापती पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
पंचायत समिती निवडणूक
पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक दि. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समिती कार्यालयात होणार आहे.
जिल्हा परिषद निवडणूक
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता पार पडणार आहे.
पिठासीन अधिकारी
जिल्हा परिषद : अप्पर जिल्हाधिकारी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील.
लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर पंचायत समिती : संबंधित उपविभागीय अधिकारी पिठासीन अधिकारी राहतील.
रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर पंचायत समिती : संबंधित तहसीलदार पिठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील.
सदर निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis