नियमित आरोग्य तपासणी आणि संतुलित आहार हाच सुदृढ आयुष्याचा पाया - डॉ. प्रितेश जुनागडे
नाशिक, 27 फेब्रुवारी (हिं.स.) - नियमित आरोग्य तपासणी आणि संतुलित आहार हाच सुदृढ आयुष्याचा पाया असल्याचे प्रतिपादन रक्तविकार व कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ’रक्त
डॉ. प्रितेश जुनागडे


नाशिक, 27 फेब्रुवारी (हिं.स.) - नियमित आरोग्य तपासणी आणि संतुलित आहार हाच सुदृढ आयुष्याचा पाया असल्याचे प्रतिपादन रक्तविकार व कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ’रक्तविकार, आहार व उपचार’ विषयावर विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद् घाटन समारंभास विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, रक्तविकार व कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सुप्रसिध्द रक्तविकार व कॅन्सर तज्ज्ञ डॅा. प्रितेश जुनागडे यांनी सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहारपध्दतीमुळे रक्तक्षय आणि इतर रक्तविकारांचे प्रमाण वाढत आहे. योग्य आहार आणि वेळेवर केलेली तपासणी याद्वारे अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. धावती जीवनशैली, मोबाईल व संगणकाचा वाढात्या वापरामुळे व्यायमाचा आभाव आहे त्यासाठी सर्वांनी योग्य दिनचर्या पालन करावे.

ते पुढे म्हणाले की, सर्वत्र वाढते प्रदुषण व अन्नातील भेसळीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येते, त्यामुळे या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनी सजगता बाळगावी. व्यसनाचे वाढते प्रमाण, निद्रानाश व मानसिक आजार यावर प्रतिबंध आणण्यासाठी सामाजिक जागरुकता वाढणे गरजेचे आहे. ग्रामिण भागात अनुवंशिक आजारांबद्दल अनेक गैरसमज आहेत त्यांचे निराकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सांगितले की, विद्यापीठ केवळ प्रशासकीय कार्यापुरते मर्यादीत न राहता आरोग्य, आहार व व्यायम यावर सर्वांनी लक्ष केंद्री करणे गरजेचे आहे. आरोग्य विषयक तज्ज्ञांच्या व्याख्यानांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रती नवी जागरुकता निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड यांनी सांगितले की, आपला नियमित आहार संतुलित असावा. रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी फळे व हिरव्या पाल्याभाज्यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश आसावा. आरोग्याकडे वेळीच लक्ष दिल्यास भविष्यातील मोठे धोके टाळता येतात असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande