नाशिक : वडाळा रोड परिसरात दोन ठिकाणी ५२ हजार युनिटची वीजचोरी
52 thousand units of electricity stolen at two places in Wadala Road area
नाशिक : वडाळा रोड परिसरात दोन ठिकाणी ५२ हजार युनिटची वीजचोरी


नाशिक, 13 मार्च (हिं.स.)।जुना आग्रा रोड व वडाळा रोड परिसरात वीज वितरणच्या पथकाने केलेल्या तपासणीत दोन घरांमध्ये ५२ हजार युनिटची वीजचोरी करून वीज कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याची बाब समोर आली आहे.

वीजचोरीची पहिली कारवाई जुना आग्रा रोड येथे करण्यात आली. आरोपी मोईनोद्दीन जाउद्दीन कोकणी (रा. जियाउद्दीन मंजिल, नॅशनल हायस्कूलजवळ, आग्रा रोड, नाशिक) यांनी डेअरीसाठी दिलेल्या वीज मीटरमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून गेल्या १४९ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४७ हजार ६८९ युनिटची वीजचोरी केल्याची बाब लक्षात आली. त्यानुसार भद्रकाली पोलीस

पथकाने आरोपी शगुप्ता मुक्तार शेख व मुक्तार गफूर शेख (दोघेही रा. नकुल अपार्टमेंट, वडाळा रोड, नाशिक) यांच्या घरी वीज मीटरची तपासणी केली, त्यावेळी या मीटरमध्ये शेख यांनी अनधिकृतपणे फेरफार करून बारा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४ हजार ६२ युनिट्सची वीजचोरी करून वीज वितरणचे

आर्थिक वितरण केल्याची बाब समोर आली. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी महावितरणचे अधिकारी अनिलकुमार रामनारायण तिवारी (रा. श्रीरामनगर, आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यता फिर्याद दिली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास मुंबई नाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande