बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेचे अपहरण करून अत्याचार
बीड, 15 मार्च (हिं.स.)बीड तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानवीय घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून पिंपळनेर पोलिसांनी मुख्य आरोपीला
बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेचे अपहरण करून अत्याचार


बीड, 15 मार्च (हिं.स.)बीड तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानवीय घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून पिंपळनेर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला पतीसोबत घरात झोपलेली असताना आरोपीने तिचे अपहरण केले. त्याने महिलेला गावाबाहेर नदीकाठी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला चावडीवर आणून खांबाला बांधून ठेवले. सकाळी ग्रामस्थांनी पीडितेची सुटका केल्यानंतर या प्रकरणाची वाच्यता झाली. सध्या पिंपळनेर पोलीस आणि पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे या अघोरी कृत्याचा सखोल तपास करत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande