सोलापूर : सायबर अपराध्याला वर्षभराने अटक
सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपीला सुमारे एक वर्षानंतर अटक करण्यात सोलापूर शहर सायबर पोलीसांना यश आले आहे. सदर आरोपी परदेशात (नेपाळ) राहून तेथील चिनी
Cp


सोलापूर, 13 मार्च (हिं.स.)। सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपीला सुमारे एक वर्षानंतर अटक करण्यात सोलापूर शहर सायबर पोलीसांना यश आले आहे. सदर आरोपी परदेशात (नेपाळ) राहून तेथील चिनी व नेपाळी साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करत होता. त्याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या लुकआऊट नोटीसच्या आधारे त्याला दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली.सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ०४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (C) व ६६ (D) नुसार दि. १६ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधून क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये १० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादींकडून ऑनलाईन सुमारे ७२ लाख ६४ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक करण्यात आली.या गुन्ह्याच्या तपासात सोलापूर शहर सायबर पोलीसांनी आतापर्यंत एकूण चार आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामध्ये सूत्रधार आरोपी रोज मगर थापा (वय २३, पत्ता – बोसन, दक्षिणखली-१, काठमांडू, नेपाळ) तसेच त्याचा सहकारी दोरजे तमांग यांचा समावेश आहे. तपासादरम्यान फसवणुकीतील काही रक्कम सारस्वत बँकेत असलेल्या एम इंजिनिअरिंग नावाच्या चालू खात्यात वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande