
बीड, 14 मार्च (हिं.स.)।आष्टी शहरात कर्णकर्कश सायलेन्सरअसलेल्या चार बुलेट चालकांना पोलिसांनी कारवाईचा दणका दिला असून त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
आष्टी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी कर्णकर्कश सायलेन्सर बुलेट बुलेटला लावले असून त्यामुळे नागरिकांच्या कानठाळ्या बसत असून शहरातील ध्वनी प्रदूषणात वाढ झाली होती. पोलिसांनी अशा ४ चालकांवर कारवाई करत सायलेन्सर जप्त केले असून इतर काही वाहनांवरही दंडात्मक कारवाई करून चालकांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.यापुढे कोणीही बुलेटला अनधिकृत व कर्णकर्कश सायलेन्सर लावू नयेत. अन्यथा यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिला आहे. या कारवाईमुळे बुलेट चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलिस अंमलदार सचिन क्षीरसागर, नागेशराव लोमटे यांनी ही कारवाई केली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis