बिलोली शहरात 15 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
नांदेड, 14 मार्च (हिं.स.)। बिलोली शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने बिलोली शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकू
Q


नांदेड, 14 मार्च (हिं.स.)। बिलोली शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने बिलोली शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 15 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करून 6 हजार 400 रुपये दंड वसूल केला.

ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ.संजीवनी जाधव, डेंटल सर्जन डॉ. पूजा काळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड व समुपदेशक सुंदर चव्हाण तसेच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल एम एस मुद्देमवार व पोलीस कॉन्सटेबल एन एम अंबुरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande