जीएसटीचे बिल भरण्यासाठी दिलेली ३१ लाख रुपयांची रक्कम हडपली
Rs 31 lakh given for paying GST bill was snatched
जीएसटीचे बिल भरण्यासाठी दिलेली ३१ लाख रुपयांची रक्कम हडपली


अंबडच्या गॅब्रिएल कंपनीतील महिलेसह सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक, 14 मार्च (हिं.स.)।

: जीएसटीचे बिल भरण्यासाठी दिलेली रक्कम जमा न करता ३० लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेसह तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अलोक लक्ष्मीनारायण त्रिपाठी (रा. गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश) हे अंबड एमआयडीसीमध्ये गॅब्रिएल इं. लि. या कंपनीत काम करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी ज्योती जगत भाटिया (रा. फरीदाबाद, हरियाना) व त्यांचे इतर सहकारी यांनी संगनमत करून ऑटोमोटिव्ह पार्ट गॅब्रिएल कंपनीला पुरविले होते. एकूण ३० लाख ८२ हजार ७७ रुपयांची ४२७ टॅक्स बिले जीएसटी बिल हे गॅब्रिएल कंपनीकडून विनायक डाय कार्सचे प्रोप्रायटर ज्योती जगत भाटिया यांना अंबड एमआयडीसी, नाशिक व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना ठरलेल्या कराराप्रमाणे देऊन तो योग्य त्या जीएसटी प्राधिकरणाकडे भरावयास दिले होते; परंतु ही रक्कम त्यांनी न भरता गॅब्रिएल कंपनीची फसवणूक व विश्वासघात करून ३० लाख ८२ हजार ७७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. १ ऑगस्ट २०१८ ते ३१ मे २०१९ या कालावधीत अंबड एमआयडीसीत घडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande