
नांदेड, 15 मार्च (हिं.स.)।
बिलोली तालुक्यातील नजीकच्या बामणी शिवारात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर बिलोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह तीन मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण २ लाख २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन सहा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बामणी शिवार परिसरात काही इसम बेकायदेशीररीत्या जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक अतुल भोसले यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी घटनास्थळावरून ५ आरोपींना रंगेहाथ पकडले, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी - घटनास्थळावरून रोख रक्कमः ३३, २५० रुपये तीन मोटार सायकली ४ महागडे - मोवाईल संच असा एकुन २ लाख २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील काहींनी फिरता जुगार अड्डा चालवण्याची नवीन सिस्टम कार्यरत केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis