पालघर - दुचाकी ओव्हरटेकचा जीवघेणा खेळ; ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
पालघर, 17 मार्च, (हिं.स.)। बेदरकार ओव्हरटेक करण्याच्या नादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील सफाळे येथे उघडकीस आली आहे. कर्दळपाडा हद्दीतील शिवकुटीर कॉम्प्लेक्सजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात नाझीम अशपाक गाझी (वय
ट्रकखाली चिरडून तरुण ठार


पालघर, 17 मार्च, (हिं.स.)। बेदरकार ओव्हरटेक करण्याच्या नादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील सफाळे येथे उघडकीस आली आहे. कर्दळपाडा हद्दीतील शिवकुटीर कॉम्प्लेक्सजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात नाझीम अशपाक गाझी (वय २७) याचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला नाझीम हा सफाळेकडे दुचाकीने येत होता. यावेळी त्याने पुढील पिकअप वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंदाज चुकल्याने समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला त्याची दुचाकी जोरदार धडकली. या भीषण धडकेत तो ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला आणि क्षणात त्याचा चिरडून मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच सफाळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, बेदरकार वाहनचालकांमुळे रस्त्यावरचे अपघात वाढत असून प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande