जळगावमध्ये पोटहिस्सा मोजणी व नकाशे अद्ययावत करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू
जळगाव, 18 मार्च (हिं.स.) : राज्यातील जमिनीच्या नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख यामधील विसंगती दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत पोटहिस्सा मोजणी व नकाशे अद्ययावत करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पास
जळगावमध्ये पोटहिस्सा मोजणी व नकाशे अद्ययावत करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू


जळगाव, 18 मार्च (हिं.स.) : राज्यातील जमिनीच्या नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख यामधील विसंगती दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत पोटहिस्सा मोजणी व नकाशे अद्ययावत करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुक्यांची निवड करण्यात आली असून, एकूण 18 तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील गोळेगाव खुर्द, गोळेगाव बुद्रूक, पाचदेवळी, करंजी आणि भानखेडा या पाच गावांची सुरुवातीला निवड करण्यात आली आहे.सुरुवातीच्या टप्प्यात या गावांमध्ये जमिनीच्या पोटहिस्स्यांची मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या उपक्रमामुळे नकाशे व 7/12 अधिकार अभिलेखातील तफावत दूर होऊन, जमिनीच्या हद्दी व क्षेत्राबाबतचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande