अकोल्यातील उड्डाण पुलावर धावत्या कारला भीषण आग; पाच प्रवासी थोडक्यात बचावले
अकोला, 17 मार्च, (हिं.स.)। अकोला शहरातील दक्षता नगर पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलावर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गाडी रत्नागिरी येथील असून या वाहनात पाच प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधान
Photo


अकोला, 17 मार्च, (हिं.स.)। अकोला शहरातील दक्षता नगर पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलावर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गाडी रत्नागिरी येथील असून या वाहनात पाच प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक वाहनातून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झाले होते.दरम्यान, या आगीमुळे उड्डाण पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande