अकोला - जिल्हा रोजगार केंद्रातर्फे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह; ८८ पदांसाठी भरती
अकोला, 17 मार्च, (हिं.स.)। अकोला जिल्हा रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रातर्फे प्लेसमेंट ड्राईव्ह उद्या (१८ मार्च) रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. त्यात ४ नामांकित कंपन्यांसाठी ८८ पदांची भरती होईल, असे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले
अकोला - जिल्हा रोजगार केंद्रातर्फे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह; ८८ पदांसाठी भरती


अकोला, 17 मार्च, (हिं.स.)। अकोला जिल्हा रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रातर्फे प्लेसमेंट ड्राईव्ह उद्या (१८ मार्च) रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. त्यात ४ नामांकित कंपन्यांसाठी ८८ पदांची भरती होईल, असे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.

मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय व पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून मुलाखतीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे. बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, २रा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande