अकोला : स्थायी समिती सभापतींनी घेतला मलेरिया विभागाचा आढावा
अकोला, 17 मार्च (हिं.स.)। स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे मलेरीया विभागाची पुन्हा आढावा सभा घेण्यात आली आहे.यापुर्वी मलेरीया विभागाचे झालेल्या बैठकीमध्ये 20 कर्मचारी वाढविणे, डस्टींग पंप खरेदी करणे, विभागास आवश्यक असलेल्या फर्नीचर
Photo


अकोला, 17 मार्च (हिं.स.)। स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे मलेरीया विभागाची पुन्हा आढावा सभा घेण्यात आली आहे.यापुर्वी मलेरीया विभागाचे झालेल्या बैठकीमध्ये 20 कर्मचारी वाढविणे, डस्टींग पंप खरेदी करणे, विभागास आवश्यक असलेल्या फर्नीचर बाबत कार्यवाही करणे, मलेरीया विभागाचे कामकाजाचे अनुषंगान नव्याने नियोजन करणे, अकोला शहरामध्ये मच्छराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे डेंगु, चिकन गुनिया मलेरिया व इतर रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याबाबत तसेच याबाबत तातडीने कार्यवाही करणेबाबत आठ दिवस अगोदर सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु आज घेण्यात आलेल्या सभेमध्ये याबाबत पुन्हा वरील विषयाबाबत चर्चा केली असता याबाबत कोणतीही कार्यवाही संबधीत विभागाने केली असल्याचे दिसुन आले नाही. तसेच सदर विभागामध्ये एकूण 16 कर्मचारी असुन 3 दिव्यांग आणि 2 कर्मचारी गैरहजर आहेत, त्यांचेवर सुध्दा कोणतीही प्रशासकीय कार्यवाही करण्यात आलेली नाही.

तसेच याबाबत संपुर्ण बाबींची माहिती बाबत डॉ. श्रीमती पहुरकर यांना विचारणा केली असता त्यांनी वेळ मिळाला नसल्याबाबतचे उडवाउडवीचे उत्तर दिले. प्रशासकीय अधिकारी यांचे कडुन अशा प्रकारे उत्तर देणे ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. करीता त्यांचेवर प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात येवून त्यांचे कडे असलेले वैद्यकीय अधिकारी पदाचा सुध्दा पदभार काढण्यात यावा. तसेच इतर अनुभवी अधिकारी डॉ. अविनाश सोनोने यांचे कडे (MOH) वैद्यकीय अधिकारी तथा निबंधक आणि अनुप चौधरी (AMOH) अतिरीक्त वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पदभार देण्यात यावा. तसेच श्रीमती शितल चव्हाण यांना उपनिबंधक पदावर देण्यात यावे, तसेच मलेरीया विभागातील कर्मचारी सतत गैरहजर आहेत त्यांचेवर निलंबानाची कार्यवाही करण्यात येवून सदर विभागास कार्यरत असलेल्या प्रकाश बामनेट, पर्यवेक्षक, प्रकाश राठोड प्र. लिपिक यांना सुध्दा कामात हयगय केल्याबाबत कारणे दाखवा सुचना देण्यात यावी जेणेकरुन प्रशासकीय कामात गतीमानता येईल या आशयाचा पत्र स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी यावेळी प्रशासनास निर्देश दिले आहे. यावेळी नगरसेवक सिध्दार्थ उपरवट, मनपा उपायुक्त विजय पारतवार, मलेरिया विभागाचे डॉ.नितीन गायकवाड, डॉ.अनुप चौधरी, डॉ.विजय चव्हाण यांचेसह मलेरिया विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande