अकोला - स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन
अकोला, 17 मार्च, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत होस्टेल मॅनेजमेंट संकेतस्थळावर अर्ज सादर केलेल्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. तथापि, अर्जांत त्रुटी आढळून येत असून, विद्यार्थ्यांनी २५ मार्चपूर्वी पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन समाजकल्
अकोला - स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन


अकोला, 17 मार्च, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत होस्टेल मॅनेजमेंट संकेतस्थळावर अर्ज सादर केलेल्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. तथापि, अर्जांत त्रुटी आढळून येत असून, विद्यार्थ्यांनी २५ मार्चपूर्वी पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाने केले आहे.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, गुणपत्रिका न जोडणे किंवा अनुत्तीर्ण असणे, जुनी कागदत्रे जोडणे अशा त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लॉगिनवर अर्जाची स्थिती पाहुन जर अर्ज सेंड बॅक त्रृटीत असेल तर तत्काळ दुरुस्ती करुन अर्ज सादर करावा.

त्याचप्रमाणे, कार्यालयाशी दि. 25 मार्च रोजी 12 ते 5 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. मुदत लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेत कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande