अकोला : ट्रॅक्टर नोंदणीसाठी 31 मार्च अंतिम मुदत
अकोला, 17 मार्च (हिं.स.) : कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर इंजिनसाठी लागू असलेले स्टेज-थ्री प्रदूषण मानक (ट्रॅक्टर इमिशन नॉर्म) असलेल्या वाहनांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार य
अकोला : ट्रॅक्टर नोंदणीसाठी 31 मार्च अंतिम मुदत


अकोला, 17 मार्च (हिं.स.) : कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर इंजिनसाठी लागू असलेले स्टेज-थ्री प्रदूषण मानक (ट्रॅक्टर इमिशन नॉर्म) असलेल्या वाहनांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेज-थ्री मानक असलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कंबाईन हार्वेस्टरची नवीन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.

या मुदतीनंतर अशा प्रकारच्या कृषी वाहनांची नोंदणी राज्यातील कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात केली जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील वाहन वितरक तसेच खरेदीदारांनी संबंधित वाहनांची नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रातील वाहनधारकांनी नियमांचे पालन करून अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande