लातूर मनपा स्थायी व परिवहन समिती सभापतींची निवड 24 रोजी
लातूर, 17 मार्च (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी व परिवहन समिती सभापतींची निवड मंगळवार २४ मार्च रोजी होणार आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सभापती निवडीसाठी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.यासाठी मंगळवार दि.१७ मार्च रोजी
महानगरपालिका


लातूर, 17 मार्च (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी व परिवहन समिती सभापतींची निवड मंगळवार २४ मार्च रोजी होणार आहे.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सभापती निवडीसाठी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.यासाठी मंगळवार दि.१७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्रांच्या अर्जांची विक्री सुरू झाली.शुक्रवार दि.२० मार्च रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीत महापालिका सचिवांकडे नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील.मनपाच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवार दि.२४ रोजी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल.याच दिवशी उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर स्थायी व परिवहन समिती सभापतींची निवड केली जाईल. यासाठी हात वर करून मतदान घेतले जाईल,अशी माहिती महापालिका सचिवांकडून देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande