गोदाकाठच्या गावांसाठी ‘गोदावरी परिक्रमा मार्ग’ची मागणी
परभणी, 17 मार्च (हिं.स.)। रामकिशन रौंदळे यांनी गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना जोडणारा ‘गोदावरी परिक्रमा मार्ग’ मंजूर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रौंदळे यांनी म
गोदाकाठच्या गावांसाठी ‘गोदावरी परिक्रमा मार्ग’ची मागणी


परभणी, 17 मार्च (हिं.स.)। रामकिशन रौंदळे यांनी गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना जोडणारा ‘गोदावरी परिक्रमा मार्ग’ मंजूर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

रौंदळे यांनी मांडलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेच्या आस्थेचा विषय असलेल्या गोदावरी नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत दोन्ही तटांवर परिक्रमा मार्ग उभारल्यास गोदाकाठच्या गावांतील दळणवळणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकतात. तसेच या मार्गामुळे अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो आणि ती पुढे राजमुंद्री पर्यंत सुमारे १४६५ किमी प्रवास करते. या मार्गावर नाशिक, कोपरगाव, पैठण, नांदेड तसेच बासर यांसारखी प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. सध्या गोदाकाठच्या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रस्तावित परिक्रमा मार्गामुळे भाविकांसह स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास रौंदळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या मागणीवर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर मार्गास मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande