
नाशिक, 17 मार्च (हिं.स.) संपूर्ण देशामध्ये गॅसची टंचाई असताना नाशिक शहरातील सातपूर परिसरामध्ये अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस टाकीतून गॅस भरत असताना पुरवठा विभागाने सोमवारी सायंकाळी उशिरा टाकलेल्या छाप्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून सुमारे 26 लाख रुपयांची सामुग्री जप्त करण्यात आली आहे . या प्रकरणामध्ये सात आरोपींसह या एका गॅस एजन्सीच्या मालकाला विरोधात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या इराण इराक अमेरिका असे युद्ध सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गॅसची टंचाई आहे. शहर आणि जिल्ह्यामध्ये गॅसची टंचाई असल्यामुळे नागरिक मेटाकोटीला आलेले आहे परंतु हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र गॅसचा गोरख धंदा हा गॅस एजन्सीच्या मालकाच्या पाठिंबामुळे सुरू असल्याची बाब पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यामुळे समोर आली आहे . त्यामध्ये विविध भागांमध्ये पुरवठा विभागाच्या वतीने बेकायदेशीर सिलेंडरचा साठा शोधण्याचे काम सुरू आहे असे असताना राज्यामध्ये प्रथमच अशा स्वरूपाचा छापा टाकून गॅस मालकासह सात जणांचा सहभाग असल्याचे समोर आलेले आहे
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रशांत केदारनाथ सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की सोमवार दिनांक 16 मार्च रोजी संध्याकाळी 06.45 वा जिल्हा पुरवठा अधिकारी . रमेश गायकवाड यांनी मला फोन करून नाईस एरिया जहागिर बेकरी जवळ एमआयडीसी सातपुर तेथे जिल्हा पुरवठा अधिकारी . रमेश गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती अर्पिता टुडे, अप्पर जिल्हाधिकारी , अमोल निकम, एचपीसीएलचे विक्री अधिकारी भुपेन पाटील , बीपीसीएलचे सेल्स अधिकारी राजकुमार यादव लिपिक सुनिल आदींनी एमआयडीसी परिसरात असलेल्या जहागीर बेकरी या ठिकाणी नादुरुस्त आयशर क्रमांक एम. एच. 15 बी.जे.2530 या वाहनात एच.पी.सि.एल (घरगुती 14 कि.लो) व एच.पी.सि.एल (व्यवसायिक 05 कि.लो) भरलेला टाक्या मोठ्या प्रमाणात दिसुन आल्या. तसेच जवळ उभे असलेले एम. एच. 12 एल.टी. 6292 या वाहनात देखील रिकामे सिलेन्डर मोठ्या प्रमाणात आढळुन. शेजारी एम. एच. 15 जे.ए.5416 अप्पे मालवाहु रिक्षा, एम. एच. 15 जे.ए.4831 अप्पे मालवाहू रिक्षा, एम. एच.15 एफ. व्ही. 5085 छोटा हत्ती असे वाहने ही गैस सिलेंडर भरण्यासाठी उभी होती. तेथे गॅस सिलेंडर भरण्यासाठी मजुर व गाडी चालक असे 07 इसम उभे होते. पुरवठा विभागाने या ठिकाणी छापा टाकल्याचे संबंधितांना सांगितले. नाव प्रविण संजय सांकुखे रा.हेगडेवार चौक सिडको , समाधान भावसिंग सोळंकी रा. केवलपार्क सातपुर अंबड , रविंद्र राजेन्द्र खंडाळे रा. एमएसबी कालनी सातपुर , सिंध्दाथ संजय निराळे रा. शिवशती चौक सिडको, तेजस विनोद आढळकर रा. माउली लाउँन्स , प्रितम मानसिंग राजपुत रा. आंबेडकर भाजी मार्केटजवळ सातपुर नाषिक . व्हि. प्रताप पुर्ण नाव माहित नाही रा. कार्बन नाका शिवाजीनगर नाशिक असे सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी . रमेश गायकवाड यांनी सदर इसमास काय करत आहे असे विचारले असता त्यांनी घरगुती गॅस हे अवैधरित्या एका वाहनातुन दुस-या वाहनात भरुन काळया बाजारात विक्री करत आहे असे सांगितले. त्यानंतर सदर व्यवसाय कोणाचा आहे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी स्वामी समर्थ गॅस एजन्सी, महात्मा नगर, नाशिक येथील असुन मालक हर्शल सरनाईक रा. प्लॅट नं 402 वाटरफ्रन्ट सोसायटी जलालपुर शिवार, गंगापुर, नाशिक असे असल्याचे सांगितले. त्यानंतर या ठिकाणी असलेले गॅस सिलेंन्डर जप्त केले त्याचे वर्णन खालीलप्रमाणे 4,92,328/- रु कि 158 एच.पी.सि.एल (घरगुती 14 कि. लो) भरलेला टाक्या (आयषर क्रमांक एम.एच. 15 बी. जे. 2530 या वाहनात मिळुन आलेले) , 14,440/-रु कि 10 एच.पी. सि.एल (व्यवसायिक 05 कि. लो) भरलेला टाक्या (आयषर क्रमांक एम.एच. 15 बी. जे. 2530 या वाहनात मिळून आलेले) , 6,35,800/-रु कि 273 एच.पी. सि.एल (घरगुती 14 कि.लो) क्रमांक एम.एच.12 एल.टी. 6292 या वाहनात मिळुन आलेले) रिकाम्या टाक्या (टक , 11,000/-रु कि 11 एच.पी.सि.एल (व्यवसायिक 05 कि. लो) जवळ खाली पडलेल्या रिकाम्या टाक्या गाडी
, 20,000/-रु कि 05 एच.पी.सि.एल (व्यवसायिक 35 कि. लो) रिकाम्या टाक्या गाडी जवळ खाली पडलेल्या, 2,00,000/-रु कि नादुरुस्त आयषर क्रमांक एम. एच. 15 बी.जे.2530 जु.वा.कि. अंदाजे , 4,50,000/-रु कि टक क्रमांक एम. एच.12 एल.टी. 6292 जु.वा.कि. अंदाजे
02,50,000/-रु कि एम. एच.15 एफ. व्ही. 5085 छोटा हत्ती जु.वा.कि. अंदाजे,02,50,000/-रु कि एम.एच. 15 जे.ए.5416 छोटा हत्ती जु. वा. कि. अंदाजे, 2,50,000/-रु कि एम. एच. 15 जे.ए.4831 छोटा हत्ती जु.वा. कि. अंदाजे
25लाख 73 हजार 568 रु कि अवैधरित्या गॅस सिलेंन्डर व वाहने मिळुन आला आहे घरगुती गॅस हे अवैधरित्या एका वाहनातुन दुस-या वाहनात भरुन काळया बाजारात विक्री करत असताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द जीवनाश्यक वस्तु अधिनियम 3,7 सह भारतीय न्याय संहिता कलम 287 प्रमाणे कायदेशीर र्फियाद आहे. माझी वरील प्रमाणे संगणकावरती मराठीतुन टंकलेखीत केलेली फिंयाद माझे सांगणे प्रमाणे बरोबर टंकलेखीत केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या या छापामुळे शहरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV