लातूर - वरवंटी कचरा डेपोची महापौर सोनकांबळे यांच्याकडून पाहणी
लातूर, 17 मार्च, (हिं.स.)। शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांनी आज वरवंटी येथील कचरा डेपो प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्
महापौर


लातूर, 17 मार्च, (हिं.स.)। शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांनी आज वरवंटी येथील कचरा डेपो प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत नगरसेवक अॅड. फारुख शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील रोजचा कचरा आणि त्याची विल्हेवाट लावणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची महापौरांनी बारकाईने पाहणी केली. यावेळी महापालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, स्वच्छता अधिकारी कलीम शेख आणि वरवंटी कचरा डेपो प्रमुख आशिष साठे यांनी महापौरांना प्रकल्पाच्या कामकाजाची, कचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रियेची आणि भविष्यातील नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

महत्त्वाचे मुद्दे व चर्चा:

प्रक्रिया प्रकल्पाचा आढावा: डेपोमध्ये कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया आणि त्यातून होणारी खत निर्मिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यंत्रसामग्रीची तपासणी: प्रकल्पातील यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी महापौरांनी जाणून घेतल्या.

प्रदूषणमुक्त शहराचा संकल्प: कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करून शहर अधिक स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

स्वच्छता मोहिमेत सातत्य राखण्यासाठी आणि कचरा डेपोचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या पाहणी दौऱ्यामुळे प्रकल्पातील तांत्रिक बाबी आणि सुधारणांवर सकारात्मक चर्चा झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande