रेनोचे नवीन डस्टर मॉडेल भारतात लाँच
नवी दिल्ली, 17 मार्च (हिं.स.)। रेनो इंडियाने आपली लोकप्रिय एसयूव्ही ‘डस्टर’चे थर्ड जनरेशन मॉडेल भारतात लाँच केले आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटसाठी ती 18.49 लाख रुपयांपर्यंत जाते. दरम्यान, R
New Duster Launched in India


नवी दिल्ली, 17 मार्च (हिं.स.)। रेनो इंडियाने आपली लोकप्रिय एसयूव्ही ‘डस्टर’चे थर्ड जनरेशन मॉडेल भारतात लाँच केले आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटसाठी ती 18.49 लाख रुपयांपर्यंत जाते. दरम्यान, R-Pass धारक ही नवीनएसयूव्ही १०.२९ लाख रुपयांना (एक्स-शोरूम, सुरुवातीची किंमत) सुरू होते. तीन वर्षांनंतर डस्टरचे भारतीय बाजारात पुनरागमन झाले असून यामध्ये लूक, फीचर्स आणि परफॉर्मन्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

नवीन डस्टर अधिक मस्क्युलर आणि दमदार डिझाइनसह सादर करण्यात आली आहे. फ्रंटला एलईडी हेडलॅम्प्स, मोठी ग्रिल आणि स्किड प्लेट्समुळे कारला आकर्षक रोड प्रेझेन्स मिळतो. साइड प्रोफाइलमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स, जाड बॉडी क्लॅडिंग आणि चौकोनी व्हील आर्क्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ती एक मजबूत ऑफ-रोडर वाटते. मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आले आहेत.

इंटिरियरमध्येही आधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. डबल-लेयर डॅशबोर्डसह 10.25 इंचाची टचस्क्रीन, 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि गुगल ओएस सपोर्ट मिळतो. याशिवाय वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 6 स्पीकर साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. कारमध्ये 700 लीटरचा बूट स्पेस आणि 360 डिग्री कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग्स, 31 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आणि 17 ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टीम (एडीएएस) देण्यात आली आहे. त्यामुळे ही कार सुरक्षिततेच्या बाबतीतही सक्षम ठरते. परफॉर्मन्सच्या बाबतीत, नवीन डस्टरमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात 1.3 लिटर टर्बो पेट्रोल, 1 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.8 लिटर स्ट्रॉंग हायब्रिड इंजिनचा समावेश आहे. हायब्रिड व्हर्जन दिवाळीपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या एसयूव्हीची बुकिंग सुरू झाली असून टर्बो पेट्रोल व्हेरिएंटची डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू होईल. नवीन डस्टरचा मुकाबला हुंडई क्रेटा, किआ सेल्टोस आणि मारुती ग्रँड विटारा यांसारख्या कार्सशी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande