स्मॉल कॅप कंपन्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे - संताना आफ्रा नेट्टो
जागतिक बाजारपेठा पुन्हा एकदा वाढत्या अनिश्चिततेच्या काळातून मार्गक्रमण करत आहेत. वारंवार तयार होणारे भौगोलिक राजकीय ताणतणाव आणि व्यापाराच्या बदलत्या दिशा इथपासून ते सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये व्याजदराच्या चक्रात होणाऱ्या चढउतारांपर्यंत सर्वत्र
Santana Afra Netto


जागतिक बाजारपेठा पुन्हा एकदा वाढत्या अनिश्चिततेच्या काळातून मार्गक्रमण करत आहेत. वारंवार तयार होणारे भौगोलिक राजकीय ताणतणाव आणि व्यापाराच्या बदलत्या दिशा इथपासून ते सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये व्याजदराच्या चक्रात होणाऱ्या चढउतारांपर्यंत सर्वत्र गुंतवणूकदार अशा एका वातावरणात काम करत आहेत, जे अगदी काही वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत खूपच कमी भरवशाचे राहिले आहे. अशा काळामध्ये, पोर्टफोलिओचे पुन:संतुलन म्हणजे रिबॅलन्सिंग हे केवळ धोरण उरलेले नाही तर ती एक गरज बनली आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी रिबॅलन्सिंगचा अर्थ बाजाराच्या बदलत्या वास्तवांशी आपल्या गुंतवणुकींचा मेळ साधणे व हे करताना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवरील लक्ष ढळू न देणे असा होतो. आज अनेक पोर्टफोलिओज हे पारंपरिक लार्ज कॅप कंपन्यांतील गुंतवणुकीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात झुकलेले आहेत, ऐतिहासिकदृष्ट्या त्यांनी खळबळीच्या टप्प्यामध्ये चांगले स्थैर्य दिले आहे. मात्र जागतिक परिस्थिती बदलत असताना आणि भारताची आर्थिक आगेकूच ठामपणे सुरू असताना, आता कदाचित गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओच्या मांडणीकडे पुन्हा एकदा पाहण्याची वेळ आलेली आहे.

नव्याने लक्ष द्यायला हवे असा एक गट म्हणजे स्मॉल कॅप क्षेत्र:

स्मॉल कॅप कंपन्या नेहमीच अर्थव्यवस्थेच्या सर्वात गतीशील भागाचे प्रतिनिधीत्व करतात. या व्यापारी संस्था सर्वसाधारणपणे आपल्या वाढीच्या आवर्तनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असतात व उत्पादनाचा विस्तार, डिजिटल तंत्रांचा अंगिकार, पायाभूत सोयीसुविधांचा विकास आणि वाढती देशांतर्गत खरेदी यांसारख्या संरचनात्मक बदलांचा लाभ घेणाऱ्या क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत असतात. भारत वेगाने वाढणाऱ्या काही प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण करत असताना अनेक उदयोन्मुख कंपन्यांना आपली व्याप्ती वेगाने वाढविण्याची संधी आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या पाहायचे झाल्यास, भारतातील काही सर्वात मोठ्या व सर्वाधिक यशस्वी कंपन्यांनी या मिड कॅप व लार्ज कॅप क्षेत्रात नेतृत्वाच्या जागी पोहोचण्याआधी स्मॉल कॅप म्हणूनच सुरुवात केली होती. जे गुंतवणूकदार व्यावसायिकरित्या व्यवस्थापित फंडांच्या माध्यमातून वाढीच्या या सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होतात, त्यांच्यासाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मितीची शक्यता लक्षणीय असू शकते.

त्याचवेळी, स्मॉल कॅप कंपन्या छोट्या कालावधीत अधिक अस्थिर असतात हे मान्य करणेही महत्त्वाचे आहे. बाजारपेठेची परिस्थिती बरेचदा या विभागावर लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा अधिक तीव्रपणे परिणाम करते. नेमक्या याच कारणास्तव संतुलित दृष्टिकोन अत्यावश्यक बनून जातो. गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप कंपन्यांकडे स्वतंत्र गुंतवणूक म्हणून बघण्याऐवजी त्याकडे एका विविधीकृत पोर्टफोलिओमधील एक धोरणात्मक हिस्सा म्हणून पाहिले पाहिजे.

इथेच रिबॅलन्सिंग महत्त्वाची भूमिका बजावते.

सध्याच्या जागतिक संदर्भात, जिथे अनिश्चितता हे वारंवार उद्भवणारे सूत्र ठरणार आहे, तिथे स्थैर्य व वाढीची शक्यता यांना एकत्र आणणारे पोर्टफोलिओ आवर्तनांतून मार्ग काढण्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या स्थितीत असणार आहेत. लार्ज कॅप्स लवचिकता व सातत्य पुरवू शकतील, तर स्मॉल कॅप्समुळे उदयोन्मुख संधी आणि दीर्घकालीन वाढीच्या संधी मिळू शकतील.

यातील रोचक भाग म्हणजे या विभागावर अधिक भर दिला जाणे हे बाजारात किती नव्या ऑफरिंग्जचा प्रवेश होत आहे, याचेही द्योतक आहे. नव्या युगातील असेट मॅनेजमेंट कंपन्या उद्याच्या उदयोन्मुख व्यापारी कंपन्या शोधण्याचे लक्ष्य बाळगणारी धोरणे सक्रियपणे आखत आहेत. उदाहरणार्थ, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने अलीकडेच द वेल्थ कंपनी स्मॉल कॅप फंड बाजारात आणला. बाजारपेठेच्या नेतृत्वाची पुढची लाट ही स्मॉल कॅप विश्वाची असणार आहे यामध्ये वाढता विश्वास त्यातून दिसून आला.

गुंतवणूकदारांसाठी, बाजारातील अल्पकालीन हालचालींचा पाठलाग करणे नव्हे तर एक शिस्तबद्ध, दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारणे ही महत्त्वाची बाब आहे. विशिष्ट कालावधीनंतर पोर्टफोलिओचे रिबॅलन्सिंग केल्याने गुंतवणुकीचे वाटप बाजारपेठेतील संधी व व्यक्तिगत वित्तीय उद्दीष्ट्ये या दोहोंशीही मेळ साधणारे असेल, याची खातरजमा करण्यास मदत होते.

जागतिक घडामोडींमुळे बाजारपेठेचे वातावरण रातोरात बदलू शकते अशा या जगात, सर्वात परिणामकारक धोरण हे बरेचदा सर्वात सोपे धोरण असते: विविधीकरण करत रहा, गुंतवणूक राखा आणि दीर्घकालीन वाढीच्या सूत्रांशी मेळ साधा आणि भारताच्या वाढीच्या कहाणीत, स्मॉल कॅप कंपन्या कदाचित येत्या काळातील सर्वात लक्षवेधी संधींचे प्रतिनिधीत्व करू शकतील.

- संताना आफ्रा नेट्टो, प्रोप्रायटर, नेट्टो इन्व्हेस्टमेंट्स

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande