अर्जुन डांगळे यांच्या साहित्यावर संशोधन; पूनम कुडू यांना पीएचडी
पालघर, 17 मार्च, (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातील विराथन बुद्रुक येथील चाफेवाडी गावातील पूनम प्रकाश कुडू (पूर्वाश्रमीच्या पूनम परशुराम भोईर) यांना मुंबई विद्यापीठाकडून मानव्यविद्या शाखेतील ‘विद्यावाचस्पती’ (पीएचडी) ही सर्वोच्च शैक्षणिक प
पूनम कुडू यांना पीएचडी प्रदान


पालघर, 17 मार्च, (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातील विराथन बुद्रुक येथील चाफेवाडी गावातील पूनम प्रकाश कुडू (पूर्वाश्रमीच्या पूनम परशुराम भोईर) यांना मुंबई विद्यापीठाकडून मानव्यविद्या शाखेतील ‘विद्यावाचस्पती’ (पीएचडी) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान करण्यात आली आहे.

‘अर्जुन डांगळे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास’ या विषयावर त्यांनी आपला संशोधन प्रबंध सादर केला होता. मुंबई विद्यापीठात नुकताच पार पडलेल्या मौखिक परीक्षेनंतर त्यांच्या पीएचडी पदवीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

पूनम कुडू यांनी वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागातील डॉ. शत्रुघ्न फड यांच्या मार्गदर्शनाखाली २०२० पासून संशोधनाला सुरुवात केली होती. सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी हे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले.

मौखिक परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे डॉ. अनिल सकपाळ यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले, तर कोल्हापूर येथील डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी बाह्य परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी विविध क्षेत्रांतील सुमारे ३० अभ्यासक आणि संशोधक उपस्थित होते.

सौ. पूनम कुडू यांच्या या यशामागे त्यांचे वडील परशुराम गजानन भोईर (रा. विराथन बुद्रुक, चाफेवाडी) तसेच पती प्रकाश हिरा कुडू (रा. विरार-अर्नाळा) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande