
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगरमहापालिका व जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपमध्ये हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. राजकीय क्षेत्रातील अनेकांना महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची संधी असून सुमारे २५० इच्छुकांनी बायोडेटा सादर केले आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या टीमच्या पाहणी अहवालानंतर अंतिम निर्णय होणार आहे. निवडणूक लढवू न शकलेले किंवा सामाजिक कार्य करणाऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा विचार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया सुरू असून अधिवेशनानंतर अंतिम निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis