नांदेड - किनवट येथे श्रीरामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड, 17 मार्च, (हिं.स.)। चैत्र नवरात्र महोत्सव आणि रामनवमी निमित्त किनवट येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यासाठी विविध क
नांदेड - किनवट येथे श्रीरामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


नांदेड, 17 मार्च, (हिं.स.)। चैत्र नवरात्र महोत्सव आणि रामनवमी निमित्त किनवट येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

उत्सवाची सुरुवात सकाळी ५.०० वाजता श्रीरामांच्या महाअभिषेक आणि पूजेसह होणार आहे. त्यानंतर सकाळी ७.०० वाजता सामूहिक आरती आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९.०० वाजता शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १२.०० वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. यावेळी श्रीरामाच्या जन्माचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी ४.०० वाजता शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याशिवाय चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त २० मार्च ते २६ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत श्रीरामचरितमानसावर आधारित श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कथा किनवट येथील रामनगरमधील श्रीराम मंदिरात होणार असून प्रसिद्ध कथावाचक प्रा. तपनकुमार मिश्रा हे रामकथेचे निरूपण करणार आहेत. रामभक्तांसाठी हा आध्यात्मिक आणि भक्तिमय सोहळा ठरणार असून श्रीरामचंद्रांच्या भक्तीमय वातावरणात भाविकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. श्रीराम हे दयाळू, करुणामय आणि भक्तांचे संकट दूर करणारे आहेत. त्यांच्या चरणी भक्ती अर्पण करून भक्त जीवनातील भय व दुःखांवर मात करण्याची प्रेरणा घेतात, असा संदेश या उत्सवातून दिला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थान, किनवट यांच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे विश्वस्त वेंकट सातुरवार व वेंकट भंडारवार यांनी केले आहे. तसेच सदर कार्यक्रमाची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande