बीड : महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेची कार्यकारिणी जाहीर
बीड, 17 मार्च (हिं.स.)। महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी निखिल शिंदे कार्याध्यक्षपदी अविनाश उगले तर शहराध्यक्षपदी नितीन राऊत यांची निवड झाली. अ.भा. महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा कार्यकारणी जा
बीड : महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेची कार्यकारिणी जाहीर


बीड, 17 मार्च (हिं.स.)। महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी निखिल शिंदे कार्याध्यक्षपदी अविनाश उगले तर शहराध्यक्षपदी नितीन राऊत यांची निवड झाली.

अ.भा. महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अॅड. सुभाष राऊत यांच्या शिफारशीनुसार समता परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निखिल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्षपदी अविनाश उगले तर शहराध्यक्षपदी नितीन राऊत यांची निवड समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विस्तार आणि संघटन व्हावे यासाठी समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी खा. समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे बैठक संपन्न झाली.

समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेत अहोरात्र तन-मन-धनाने कार्य करणारे निखिल शिंदे यांची बीड जिल्हाध्यक्षपदी, अविनाश उगले यांची बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी तर नितीन राऊत यांची बीड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande