मुंबईत एसीबीची कारवाई : खार पोलिस ठाण्याच्या एपीआयला लाच घेताना अटक
मुंबई , 17 मार्च (हिं.स.)। राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून आणखी एका प्रकरणात खार पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) तुषार काळे यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई पोली
Khar Police Officer Arrested for Accepting a Bribe


मुंबई , 17 मार्च (हिं.स.)। राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून आणखी एका प्रकरणात खार पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) तुषार काळे यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पोलीस खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रॉपर्टी प्रकरणातील चौकशी अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तुषार काळे यांनी संबंधित व्यक्तीकडे 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. या मागणीनंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचत कारवाई केली.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने दीड लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी तुषार काळे यांची भेट घेतली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने छापा टाकत त्यांना रंगेहात अटक केली. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली. सदर प्रकरण वांद्रे न्यायालयाशी संबंधित असून त्याची चौकशी करण्याची जबाबदारी तुषार काळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे आणि एसीबीच्या तात्काळ कारवाईमुळे हा प्रकार उघडकीस आला. आरोपी अधिकाऱ्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांत एसीबीने महसूल, प्रशासन आणि पोलीस विभागात अनेक धाडी टाकून भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेरबंद केले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील मोहीम अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande