हवाई प्रवाशांसाठी नवे नियम : सरकारचे महत्त्वाचे निर्देश जाहीर
नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : नागरिक उड्डयन मंत्रालयाने बुधवारी हवाई प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे नवीन नियम जाहीर केले आहेत. या निर्णयानुसार, प्रत्येक फ्लाइटमध्ये किमान 60 टक्के जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला
विमान लोगो


नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : नागरिक उड्डयन मंत्रालयाने बुधवारी हवाई प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे नवीन नियम जाहीर केले आहेत. या निर्णयानुसार, प्रत्येक फ्लाइटमध्ये किमान 60 टक्के जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, ज्यामुळे सर्व प्रवाशांना समान संधी मिळू शकेल.

मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की, एकाच पीएनआरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानात एकत्र बसविणे आवश्यक आहे. शक्यतो त्यांना शेजारील जागांवर बसवावे, जेणेकरून प्रवास अधिक सोयीस्कर होईल. नागरिक उड्डयन महानिदेशालयाने (डीजीसीए) जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रवाशांच्या सुविधा, पारदर्शकता आणि सर्व विमान कंपन्यांमध्ये एकसमान कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात आला आहे.तसेच, क्रीडा साहित्य आणि वाद्य यंत्रे वाहून नेण्याची सुविधा स्पष्ट व प्रवासी-अनुकूल पद्धतीने दिली जाईल. यासाठी सुरक्षा आणि कार्यप्रणालीचे नियम लागू राहतील. याशिवाय, पाळीव प्राण्यांना विमानाने नेण्यासाठीही विमान कंपन्यांनी स्पष्ट आणि पारदर्शक धोरणे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला आहे. ‘UDAN’ योजनेमुळे हवाई प्रवास अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होत असल्याचे मंत्रालयाने सांगितले.इतर निर्देशांमध्ये प्रवाशांच्या हक्कांचे काटेकोर पालन करणे, विशेषतः उड्डाण उशीर, रद्द होणे किंवा बोर्डिंग नाकारले जाण्याच्या परिस्थितीत योग्य सुविधा देणे यांचा समावेश आहे. तसेच, विमान कंपन्यांनी आपल्या वेबसाइट, मोबाईल अ‍ॅप्स, बुकिंग प्लॅटफॉर्म आणि विमानतळांवरील काउंटरवर प्रवाशांच्या हक्कांची माहिती ठळकपणे प्रदर्शित करावी आणि ही माहिती प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून द्यावी, असे सांगण्यात आले आहे.

अधिकृत निवेदनात मंत्रालयाने नमूद केले की, प्रवाशांची सोय ही त्यांची सर्वोच्च प्राधान्य आहे. याच उद्देशाने ‘UDAN यात्री कॅफे’, ‘Flybrary’ (मोफत पुस्तक सेवा) आणि विमानतळांवर मोफत वायफाय सुविधा यांसारख्या प्रवासी-केंद्रित उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande