
नवी दिल्ली , 18 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सांगितले आहे की होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेली सर्व २२ भारतीय जहाजे सुरक्षित आहेत. यापूर्वी भारताने मंगळवारी त्या अहवालांचे खंडन केले होते, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून भारतीय ध्वज असलेल्या किंवा भारताकडे येणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याच्या बदल्यात आपल्या ताब्यातील तीन टँकरांची अदलाबदल करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन सूत्रांच्या हवाल्याने सोमवारी वृत्त दिले होते की भारताने यापूर्वी काही टँकर जप्त केले होते. त्यांच्यावर आपली ओळख लपवणे किंवा त्यात बदल करणे तसेच समुद्रात जहाजांदरम्यान होणाऱ्या बेकायदेशीर माल हस्तांतरणात सहभागी असल्याचा आरोप होता.नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जायसवाल यांनी सांगितले, “आमची अनेक जहाजे अजूनही होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेली आहेत. त्या जहाजांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी आम्ही इराण आणि इतर देशांशी चर्चा करण्याची योजना आखत आहोत.”अहवालात १५ फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाने दाखल केलेल्या पोलिस तक्रारीचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार ‘अस्फाल्ट स्टार’ हे जहाज जड इंधन तेलाच्या तस्करीत सहभागी होते. हे तेल ‘अल जाफजिया’ या जहाजात आणि बिटुमेन ‘स्टेलर रूबी’ या जहाजात हस्तांतरित करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode