नांदेड जिल्ह्यातील कारल्यात दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)। गुडीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर कारला गावातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास १९ मार्च पासून प्रारंभ होणार असून २६ मार्च पर्यंत चालणार आहे. या सप्ताहामध्ये भव्य शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी प
नांदेड जिल्ह्यातील कारल्यात दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह


नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।

गुडीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर कारला गावातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास १९ मार्च पासून प्रारंभ होणार असून २६ मार्च पर्यंत चालणार आहे. या सप्ताहामध्ये भव्य शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे. दररोज हरिकीर्तन होणार या भक्तीमय सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थानी केले आहे.

कारला येथील हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह गत ११ वर्षांपासून गावात सुरु आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवपुराण कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आली आहे. या शिवपुराण कथा व्यासपीठ ह. भ प. बालयोगिनी मुक्ताईनाथ गुरु महेश्वरीनाथ यांच्या वाणीतून होणार आहे.

गणेश महाराज मुटेवाड पाहणार आहेत. सप्ताहात सकाळी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ५ शिवपुराण कथा, सांयकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन, रात्रभर जागर होणार आहे. हरिकीर्तनकार म्हणून किरण महाराज शेगावकर, लक्ष्मण महाराज मांडवाड, ह.भ.प. कृष्णा महाराज बोंम्पीलवार कार्लेकर, ह.भ.प.बालयोगी गजेन्द्र चैतन्य महाराज, ह.भ.प.प्रकाश महाराज वाळकेवाडीकर, ह.भ.प. गुरुवर्य महारुद्र स्वामी महाराज, ह.भ.प. भगवतीताई महाराज सातारकर यांचे हरिकीर्तन होणार आहेत. काल्याचे कीर्तन रमेश महाराज बुचाले पुर्णेकर यांचे होणार आहे. शिवपुराण कथा सोहळ्यात गायनाचार्य ह.भ.प.लक्ष्मण महाराज मंदेवाड, ह.भ.प.मारोती महाराज सिबदरेकर, ह.भ.प. भगवान महाराज

गुंफलवाड, ह.भ.प. नारायण महाराज वडगावकर, ह.भ.प. दशरथ महाराज नरोटे, काकडा संच हार्मोनियम ह.भ.प. रामदास महाराज बोंपीलवार, गायनाचार्य ह.भ.प. शिवाजी महाराज भंडारे, ह.भ.प. अशोक महाराज बोंपीलवार, ह.भ.प.अशोक महाराज चपलवाड, तबलावादक रामराव लुम्दे, मृदंगाचार्य प्रथमेश एटलेवाड, ह.भ.प.हर्ष बालाजी मिराशे, विणेकरी ह.भ.प.परमेश्वर इटेवाड, ह.भ.प. दत्तराव चितलवाड, चोपदार माधव महाराज गारशेटवाड हे राहणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या किर्तनानंतर भाविकांसाठी शिरा पुरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहामध्ये बजरंग दलाकडून सेवा देण्यात येणार असुन या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन कारला गावकऱ्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande