
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। गुणवत्तापूर्ण, चविष्ट आणि आरोग्यदायी अन्न मिळणे हा सर्वांचा हक्क असून तो जागरूकतेने मिळवण्यासाठी प्रत्येकाने सदैव जागृत राहिले पाहिजे असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांनी सांगितले.
अन्न औषध सुरक्षा मानके व कायदा, भेसळ विरहित अन्नाचे प्रकार ओळखण्याचे उपाय सांगितले.
गुणवत्तापूर्ण, चविष्ट आणि आरोग्यदायी अन्न मिळणे हा सर्वांचा हक्क असून तो जागरूकतेने मिळवण्यासाठी प्रत्येकाने सदैव जागृत राहिले पाहिजे . भेसळ किंवा अन्नपदार्थांच्या तक्रारीबाबत१८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .
फूड सेफ्टी या अँप वर ज्या अन्नपदार्थाची चव, गुणवत्ता, भेसळ असेल अशा पदार्थांविषयी तक्रार नोंदण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहे त्याचा उपयोग आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी करावा असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. विभागाअंतर्गत पनीर, दूध, ,चहा पावडर ,हळद, मिरची पावडर या महत्वपूर्ण आणि दैनंदिन वापरात असलेल्या पदार्थांमध्ये भेसळ आहे हे कशी ओळखायची याबाबतचे प्रात्यक्षिके या कार्यक्रमात दाखवण्यात आले. उपनियंत्रक, वैद्यमापन यंत्र वजने विभागाचे शिवाजी मुंडे यांनी वस्तू व उत्पादनाच्या वजनाबाबत शंका असल्यास तक्रार दाखल करण्यासाठी एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले .
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis