चहाच्या टपरीवर २३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त आरोपी महेश बिल्डरला अटक
अमरावती, 18 मार्च (हिं.स.)। शहरात अमली पदार्थाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमे अंतर्गत, अमरावती गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता, गुन्हे शाखेच्या पथकाने राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर येथील बेनाम चौकातील एक
चहाच्या टपरीवर २३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त आरोपी महेश बिल्डरला अटक


अमरावती, 18 मार्च (हिं.स.)।

शहरात अमली पदार्थाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमे अंतर्गत, अमरावती गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता, गुन्हे शाखेच्या पथकाने राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर येथील बेनाम चौकातील एका चहा आणि नाश्त्याच्या कॅन्टीनवर छापा टाकला आणि ३.५२ लाख किमतीचे २३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. या पोलीस कारवाईदरम्यान, आरोपी महेश राजू खोडे (वय २६, समर्थवाडी, साईनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून २३.५३० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे बाजार किमत ३,५२,००० रु. आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेशाखा गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई करत आहे.

या मोहिमेअंतर्गत, अमरावतीमध्ये आतापर्यंत लाखो रुपयांचे अवैध अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. बेनाम चौकातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक खुलासा हा आहे की, ज्या ठिकाणी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले, ते एक साधे चहा नाश्त्याचे दुकान होते, जिथे एमडी (ड्रग) अमली पदार्थांची अवेधरित्या विक्री केली जात होती. यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी महेश याच्यावर यापूर्वी विविध गुन्हेगारी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, त्याचे शहरात कार्यरत असलेल्या इतर अमली पदार्थ नेटवर्कबद्दल अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केले. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेला अमली पदाथांच्य तस्करीसंदर्भात अनेक ठोस धागेदोरे मिळाले आहेत, ज्यांचा पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच् मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चौहान यांच नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande