मद्य प्रेमींसाठी खुशखबर! 'ॲसगार्ड अल्कोबेव्ह'च्या गोल्डन ईगलचे पुनरागमन
* ॲसगार्ड अल्कोबेव्हची मोठी घोषणा मुंबई, १८ मार्च (हिं.स.) : मद्यपेय क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲसगार्ड अल्कोबेव्ह लिमिटेड आधीच बाणगंगा पेपर इंडस्ट्रीजने एक मोठी व्यावसायिक घोषणा केली आहे. कंपनीची उपकंपनी सीएमजे ब्रुअरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्र्य
ॲसगार्ड अल्कोबेव्ह गोल्डन ईगल


* ॲसगार्ड अल्कोबेव्हची मोठी घोषणा

मुंबई, १८ मार्च (हिं.स.) : मद्यपेय क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲसगार्ड अल्कोबेव्ह लिमिटेड आधीच बाणगंगा पेपर इंडस्ट्रीजने एक मोठी व्यावसायिक घोषणा केली आहे. कंपनीची उपकंपनी सीएमजे ब्रुअरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्र्यूज अँड ब्लिस एलएलपी यांच्यात ऐतिहासिक गोल्डन ईगल बिअरच्या उत्पादनासाठी करार झाला आहे. या करारामुळे ईशान्य भारत आणि भूतानमध्ये या प्रतिष्ठित ब्रँडचे पुनरागमन होणार आहे.

मोहन मीकिन लिमिटेडचा अधिकृत भागीदार असलेल्या ब्र्यूज अँड ब्लिसकडे या ब्रँडचे उत्पादन आणि विक्रीचे विशेष हक्क आहेत. आता या भागीदारीमुळे मेघालयातील बर्नीहाट येथील सीएमजे ब्रुअरीजच्या अत्याधुनिक प्लांटमध्ये या बिअरचे उत्पादन केले जाईल.

या करारांतर्गत गोल्डन ईगल नावाने अनेक उत्पादने तयार केली जाणार आहे. त्यात गोल्डन ईगल स्ट्रॉन्ग (Golden Eagle Strong), गोल्डन ईगल माईल्ड (Golden Eagle Mild), गोल्डन ईगल प्रीमियम स्ट्रॉन्ग, गोल्डन ईगल प्रीमियम माईल्डचा समावेश आहे.

कोणत्या राज्यांना होणार फायदा?

ईशान्य भारतातील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उभय कंपन्यांमध्ये हा महत्त्वपूर्ण करार झाला आहे. यामध्ये मेघालय, त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि शेजारील देश भूतान या क्षेत्रांचा समावेश आहे. 31 मार्च 2029 पर्यंत हा करार अंमलात राहणार असून भविष्यात इतर बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची तरतूदही यात आहे.

गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी मोठी संधी

या ग्रँड अलायन्समुळे केवळ दोन्ही कंपन्यांचे सामर्थ्य वाढणार नाही, तर भागधारकांना मोठा आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. सीएमजे ब्रुअरीज ही ईशान्य भारतातील सर्वात विश्वासार्ह 'कॉन्ट्रॅक्ट ब्रुइंग' कंपनी मानली जाते. किंगफिशर आणि कार्लसबर्ग सारख्या जागतिक ब्रँड्ससोबत काम करण्याचा अनुभव या कंपनीकडे आहे.

या भागीदारीमुळे ईशान्य भारतात गोल्डन ईगल बिअरची उपलब्धता आणि ब्रँड व्हॅल्यू वाढण्यास मदत होईल. उच्च दर्जाचे उत्पादन आणि कार्यक्षम वितरण साखळीद्वारे आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यास कटिबद्ध आहोत, असे दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

मोहन मीकिन लिमिटेडला ऐतिहासिक वारसा

सन 1855 मध्ये सोलन (हिमाचल प्रदेश) येथे स्थापन झालेली मोहन मीकिन ही भारतातील सर्वात जुनी मद्यपेय कंपनी आहे. ओल्ड मॉन्क (Old Monk) रम आणि गोल्डन ईगल बिअर यासारख्या आयकॉनिक ब्रँड्समुळे या कंपनीचा 170 वर्षांचा मोठा वारसा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande