
अहमदाबाद, 18 मार्च (हिं.स.)। आपल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या झायडस लाइफसायन्सेस लिमिटेड या आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती कंपनीने ल्युपिन लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीशी नवा करार केला आहे. झायडसचे सेमॅग्लुटाइड इंजेक्शन(१५ मिलीग्रॅम प्रति ३ मिली) भारतीय रुग्णांना उपलब्ध करुन देण्यासाठी हा परवाना आणि पुरवठा करार करण्यात आला आहे. या भागीदारीअंतर्गत रुग्णांच्या सोयीसाठी पुन्हा वापरता येण्याजोगे ‘पेन डिव्हाइस’ उपलब्ध करुन दिले जाईल. झायडसची अत्याधुनिक उतपादन संशोधन क्षमता आणि ल्युपिनचे भारतीय बाजारपेठेतील विस्तृत जाळे एकत्रित येत असल्याने चयापचयाच्या विकारांनी त्रस्त असलेलया रुग्णांना सहजरित्या अत्याधुनिक उपचार उपलब्ध होतील.
या करारानुसार, झायडसच्या सेमॅग्लुटाइड इंजेक्शनची भारतीय बाजारपेठेत विक्री करण्यासाठी ल्युपिनला सहमार्केटिंगचे अधिकार मिळाले हेत. ल्युपिन ‘सेमानेक्स्ट’ आणि ‘लिवाइराइज’ या नावांनी हे उत्पादन बाजारपेठेत उपलब्ध करुन देईल. झायडसकडून ‘सेमॅग्लिन्ट’, ‘मॅशेमा’ आणि ‘अल्टरमेट’ या ब्रँण्ड नावांनी या उत्पादनांची विक्री करेल. या भागीदारीचा भाग म्हणून ल्युपिन कंपनी झायडसला सुरुवातीच्या काळातीपरवाना शुल्ल देईल. करारातील पुढील टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ठराविक रक्कमदेखील अदा करेल.
झायडस आणि ल्युपिन कंपनीतील कराराबाबत झायडस लाइफसायन्सेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विन पटेल यांनी तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले,” आमचे नावीन्यपूर्ण संशोधन रुग्णांना आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करतात. रुग्णांची गरज ध्यानात घेत आम्ही गे पेन डिव्हाइस तयार करत आहोत. या पेन डिव्हाइच्या वापरामुळे उपचारपद्धती सोपी होईल. रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारेल. या औषधाची उपलब्धता वाढवण्यासाठी तसेच हे आधुनिक उपकरण देशभरातील रुग्णांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही ल्युपिनसोबत करार करत आहोत. हा निर्णय निश्चितच आनंददायी आहे.
ल्युपिन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गुप्ता म्हणाले,”भारतात सेमॅग्लुटाइड इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी झायडससोबत केलेला करार हा हृदय आणि चयापचयाशी संबंधित विकारांवरील अत्याधुनिक उपचार देण्याच्या आमच्या मोहिमेचे महत्त्वाचे पाऊल आहे. जागतिक स्तरावर जीएलपी-१ थेअरपीच्या उपचारांचे नवे निकष ठरत आहेत, या पार्श्वभूमीवर झायडससोबतच्या भागीदामुळे आमचा मधुमेहावरील उपचारांचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल. याद्वारे नावीन्यपूर्ण आणि उच्च दर्ज्याचे उपचार भारतातील डॉक्टर्स आणि रुग्णापर्यंत सहज उपलब्ध होतील. हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
सेमॅग्लुटाइड हे प्रामुख्याने प्रौढ वयोगटातील रुग्णांच्या उपचारांसाठी सूचवले जाते. टाईप२ मधुमेहाशी झगडणा-या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित राहते. सकस आहार आणि व्यायामानंतर या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाते. हे औषध आहार आणि व्यायामासोहत साहाय्यक उपचार म्हणून दिले जाते.
• मेटफॉर्मिन औषधाने परिणाम दिसून येत नसल्यास किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे मेटफॉर्मिन औषधाच्या सेवनाला मर्यादा येत असल्यास, सेमॅग्लुटाइट दिले जाते.
• मधुमेहाच्या उपचारासाठी वापरल्या जाणा-या इतर औषधांसोबतही पूरक उपचार म्हणूनही सेमॅग्लुटाइड औषध दिले जाते.
हे औषध केवळ मधुमेहासाठीच नव्हे तर वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठीही प्रभावी ठरते. ३० पेक्षा अधिक बॉडी मास्क इंडेक्स किंवा २७पेक्षाही अधिक बीएमआय असलेल्या रुग्णांना वाढत्या वजनामुळे रक्तदाब, टाईप २ मधुमेह आणि रक्तातील वाढलेल्या कोलेस्ट्रोचा त्रास उद्भवू लागलेल्या रुग्णांना हे औषध सूचवले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule