
मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। गोदरेज एंटरप्राइजेस समूहाच्या एनर्जी सोल्युशन्स व्यवसायाने आर्थिक वर्ष 2026 च्या अखेरीस 2,600 कोटी रुपयांचे प्रकल्प मिळवले आहेत. यामध्ये ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे विद्युतीकरण आणि रिन्यूएबल ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. वीज पायाभूत सुविधा आणि स्वच्छ ऊर्जेमधील वाढत्या गुंतवणुकीच्या पाठबळावर, या व्यवसायात आर्थिक वर्ष 2027 पर्यंत सुमारे 15 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.
ही वाढ म्हणजे ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीडचे आधुनिकीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पांसाठी असलेल्या वाढत्या मागणीचे प्रतिबिंब आहे. भारताची विस्तारित ऊर्जेची गरज भागवण्यासाठी असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसोबतच ही मागणी देशाची वीज परिसंस्था बळकट करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
वाढीच्या गतीवर भाष्य करताना, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे एनर्जी सोल्युशन्स बिझनेसचे प्रमुख राघवेंद्र मिर्जी म्हणतात, “ऊर्जा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबत स्वच्छ ऊर्जा स्रोतांकडील संक्रमणाला गती देण्यावर भारताने लक्ष केंद्रित केल्यामुळे संपूर्ण ऊर्जा परिसंस्थेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण संधी निर्माण होत आहेत. आमच्याकडील मजबूत ऑर्डर ही ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे विद्युतीकरण आणि नवीकरणीय ऊर्जा उपायांसाठी असलेली वाढती मागणी दर्शवते. प्रमुख ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठांमध्येही आम्ही आमचा विस्तार करत आहोत. यामध्ये गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, जिथे रिन्युएबल ऊर्जा क्षमतेत वेगाने वाढ होत आहे. तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील वाढत्या औद्योगिक आणि शहरी मागणीमुळे ट्रान्समिशन पायाभूत सुविधा आणि ग्रीड आधुनिकीकरण क्षेत्रातील गुंतवणूक वाढते आहे. देशाच्या विकसित होत असलेल्या ऊर्जा क्षेत्राला आधार देणाऱ्या एकात्मिक, भविष्यासाठी सज्ज पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
गेल्या वर्षभरात, कंपनीने संपूर्ण भारतात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले; याद्वारे त्यांनी ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे विद्युतीकरण आणि विकेंद्रित सौर ऊर्जा उपायांच्या क्षेत्रातील आपली क्षमता अधिक बळकट केली. यामध्ये गुजरातमध्ये 765kV क्षमतेच्या 25 युनिट AIS आणि GIS bays कार्यान्वित केले, विविध प्रदेशांमध्ये 400kV आणि त्यापेक्षा कमी क्षमतेच्या 54 युनिट AIS/GIS bays कार्यान्वित केले, तसेच सिक्कीममध्ये 220/132kV क्षमतेचे AIS उपकेंद्र उभारले गेले. रेल्वे क्षेत्रातही, कंपनीने तीन रेल्वे ट्रॅक्शन उपकेंद्रे उभारून दिली, ज्यामुळे रेल्वे जाळ्याच्या विद्युतीकरणाच्या प्रक्रियेला हातभार लागला.
जयपूरमधील 6.5 मेगावॅट पीक क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासारख्या उपक्रमांद्वारे कंपनीने आपल्या नवीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे, जे व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडून सौर ऊर्जा उपायांचा वाढता स्वीकार दर्शवते. केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 मध्ये म्हटल्याप्रमाणे, वीज पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यावर भर असल्याने या कामाला आणखी बळ मिळाले आहे.
या भागांमध्ये ट्रान्समिशन, उपकेंद्र आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांची वाढती योजना असल्यामुळे, गोदरेजचा एनर्जी सोल्युशन्स व्यवसाय वीज कंपन्या तसेच औद्योगिक ग्राहकांना विश्वसनीय पायाभूत सुविधा पुरवतो आहेच. त्या सोबतच भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या पुढील टप्प्यात योगदान देण्यासाठी भक्कम स्थितीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule