पोलिस आयुक्तालयासाठी अशोक चव्हाणांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)। खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबई येथे राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. या भेटीत नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत तसेच सेफ सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्च
अ


नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।

खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबई येथे राज्याचे पोलिस

महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. या भेटीत नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत तसेच सेफ सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा केली. अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची लवकरात लवकर निर्मिती करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, सेफ सिटी प्रकल्पांतर्गत नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. आमदार श्रीजया चव्हाण यांनी भोकर, मुदखेड व अर्धापूर शहरांनाही सेफ सिटी प्रकल्पात समावेश करण्याची मागणी केली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, नांदेड शहर पोलिस आयुक्तालय व सेफ सिटी प्रकल्पासाठी शासन स्तरावर पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. बैठकीला पोलिस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुवेझ हक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande